सन १९७३-७४ साली मॉंटेसरी आणि प्रायमरी विभाग श्री मराळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला. त्यावेळी आसपासच्या परिसरातून पालकांचे प्रबोधन करून स्वत: शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत आणत.
सन १९७३ ते १९८० (१)मुख्याध्यापक (२)शिक्षक व (३) मदतनीस असे एकूण सहा कर्मचारी काम पहात असत. मुख्याध्यापिका श्रीमती गद्रे मॅडम ह्या हायस्कूलकडे पूर्णवेळ शिक्षिका व प्रायमरी विभागाकडे अर्धवेळ अल्पशा मानधनावर काम पहात असत.
सन १९७४-७५ साली इयत्ता पहिलीच्या वर्गास सुरुवात झाली. त्यानंतर क्रमाक्रमाने तुकड्यांना मान्यता मिळून सन १९८८ साली शाळेस शासनाचे १००% अनुदान प्राप्त झाले.
प्रायमरी विभाग प्रथम पेटीत हायस्कूल जवळच असणाऱ्या पाठक इमारतीमध्ये होता. कालांतराने पाठक इमारत मोडकळीस आल्याने तिचे स्तलांतर पेटीत हायस्कूलच्या मुख्य इमारतीमध्ये करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पेटीत हायस्कूलच्या नवीन इमारतीत (अकिलो बायपास) येथे वर्ग सुरु केले आहेत.
आज प्रायमरी विभागाचे एकूण (१ली ते चौथी प्रत्येकी २ तुकड्या) ८ वर्ग, १ डिजीटल क्लासरूम, २ भाषा वर्ग (इंग्रजी आणि मराठी) १ ऑफिस असे एकूण १२ वर्ग पेटीट हायस्कूलच्या इमारतीत भारत आहेत.
सन १९७७ सालापासून सौ.महाजन एस.बी. ह्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यानंतर १९८८ पासून त्या मुख्याध्यापिका म्हणून काम पहात होत्या. सन २०१३ मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्यामुळे शाळेतील सिनिअर शिक्षिका सौ.म्हाळस एस.एस. या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. मॉंटेसरी विभागात सौ.कांबळे व्ही.एस. या गेले ३२ वर्षांपासून मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. मॉंटेसरी विभागास शासनाची मान्यता नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडून अल्पशी फी घेऊन त्यातूनच कर्मचाऱ्यांचे मानधन दिले जाते.
- मॉंटेसरी – मुख्याध्यापिका- ०१, शिक्षिका- ०१, विद्यार्थिसंख्या- ५०
- प्रायमरी – मुख्याध्यापिका-०१, शिक्षक – ०८, लिपिक-०१, शिपाई-०१, विद्यार्थिसंख्या-२०३