मुख्याध्यापक संदेश
विद्यार्थ्यांना विद्यादान करणे हे देशाच्या सीमेवरील सैनिकांप्रमाणे अतिशय पवित्र कार्य आहे. भविष्यात देशाला येणाऱ्या प्रगत आकारामध्ये शिक्षकांचं योगदान मोठ असतं. विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिक नाही तर शारीरिक,सांस्कृतिक, सामाजिक असा सर्वांगीण विकास करणं ही शाळेची महत्वाची भूमिका असते. आणि याच साठी शाळेत सतत नवनवीन उपक्रम राबविण , नवनवीन शिक्षण प्रवाह, शिक्षण क्षेत्रातील बदल, नवीन विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करणे, समाजातील विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांची मदत घेणे या सगळ्या माध्यमातून विद्यार्थ्याने आनंदाने शिक्षण घेणे त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हेच आमचे कर्तव्य आहे. याचप्रमाणे गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी माननीय सर.डॉ. मो.स.गोसावी आणि विविध पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा अधिकाधिक विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
सौ. म्हाळस स्नेहल सुरेश
मुख्याध्यापिका